बनसारोळा गावात प्रथमच महाराष्ट्र विद्यालयात विध्यार्थी कवि संम्मेलन.

केज प्रतिनिधि: तालुक्यातील बनसारोळा गावात प्रथमच विद्यार्थी कवि संमेलन होत आहे .वै.नारायणदादा काळदाते यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून शालेय विध्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना चालना मिळण्यासाठी प्रथमच बनसारोळा गावातील महाराष्ट्र विध्यालयात संस्थेचे सचिव डॉ.नरेंद्र काळे व अध्यक्ष भागवत दादा गोरे यांच्या कल्पनेतील बनेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत विद्यार्थी कवि संमेलन ठेवण्यात आले आहे. शालेय विध्यार्थ्यांच्या सूप्त गुणांना चालना मिळण्यासाठी व लहान पणापासुनच स्टेजकरेज आले तर येणारे काळात हे विध्यार्थी विविध क्षेत्रात आपले कामगिरी दाखवतील.

सामाजिक व शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या शाळेचे व बनसारोळा गावचे तसेच बीड जिल्हाचे नाव महाराष्ट्र राज्याच्या पटलावर ठसा उमठविण्यासाठी नक्कीच काम करतील .
येणाऱ्या काळात युवकांनी फुले शाहु आंबेडकर यांचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करायचे आहेत. येणारा काळात विध्यार्थीना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे आजपासून शालेय विध्यार्थ्यांनी जास्त करून व्याख्यानावर भर द्यावा .ज्या विध्यार्थ्यांचे बोलण्यावर प्रभुत्व असेल तो विध्यार्थ्यां महाराष्ट्र राज्याच्या पटलावर नक्कीच बनसारोळा व शाळेचे नाव व बीड जिल्हा च नाव महाराष्ट्रभर गाजत राहिल हे नक्की.
यासाठी मार्गदर्शक कवी म्हणून जेष्ठ कवी दगडू दादा लोमटे ,प्रा.भागवत शिंदे ,व भगवान मसने सर यांची उपस्थिती लाभणार आहे.

कवी संमेलन

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks