बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणी केज येथील हाजारो महिलांचा भव्य मोर्चा तहसीलवर धडकला

आत्तापर्यंतच्या सर्वात मोठा ठरलेल्या मोर्चात मुस्लिम महिलांसह राजकीय व सामाजिक संघटना सामिल

प्रतिनिधी..

गेल्या अनेक दिवसांपासून महिलावरील अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होताना दिसत असुन अन्याय अत्याचार रोखण्यात गृहखाते सपशेल अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.
२००२ साली गुजरात राज्यात बिल्कीस बानो नावाच्या मुस्लिम युवतीवर तेथील ११ आरोपींनी सामुहिक पाश्वी बलात्कार करुन तिच्या कुटुंबातील सर्वांची निर्घृणपणे हत्या केली होती. पिडीत बिल्कीस बानो मयत झाल्याचे पाहुन आरोपींनी तेथुन पलायन केले होते.

मात्र या सर्व घटनेतुन बानो हि वाचल्याने तिने पोलीस स्टेशन गाठुन आरोपीविरुद्ध तक्रार दिल्याने कोर्टात सदरील ११ आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा व बलात्काराचा आरोप सिद्ध होवुन न्यायालयाने वरील सर्व ११ आरोपींना सश्रम अजिवन कारावासाची शिक्षा ठोठावली असताना गुजरात राज्य सरकारने या गुन्ह्यातील आरोपींची वागणूक चांगली असल्याचे कारणावरून सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने या निर्णयाविरोधात देशातील मुस्लिम समाजात असंतोष पसरला असुन हा दिलेला निर्णय संविधानाच्या विरोधात आणि लोकशाही पायदळी तुडवत हुकुमशाही पध्दतीने दिला असल्याची खंत व्यक्त करत सर्व महाराष्ट्रभर मुस्लिम समाजासह ईतर ही पक्ष व संघटना या निर्णया विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

त्याच अनुशंगाने केज शहरातही, दि. १५ सप्टेंबर गुरुवार रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  
हा मोर्चा हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा ते तहसील कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चात अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने

बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्यावी

हजरत मोहम्मद यांच्या विषयी प्रत्येक वेळी अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करून त्यासाठी कठोर कायदा लागू करावा.


हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा पासुन तहसिल कार्यालयावर हातात काळे झेंडे घेवुन महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. केज शहरातील निघालेल्या महीलांच्या सर्वात मोठ्या निषेध मोर्च्याने केज शहर हादरून गेले होते. या मोर्चाची सुरुवात ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा येथून सुरुवात करण्यात आली. तर हा मोर्चा दुपारी १२:०० वा. केज तहसील कार्यालयावर धडकला नंतर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
या मोर्चात मुस्लिम महिलासह पुरुष व विद्यार्थी ही हाजोरोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला सर्वपक्षीय पाठिंबा दिल्याने केज शहरातील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा आणि शांततामय मोर्चा ठरला आहे.

भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कडक कायदा करावीया प्रमुख मागण्यांसाठी केज संविधान संघर्ष बचाव समितीच्या वतीने गुरुवार दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता.


हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चात जनविकासचे सर्वेसर्वा हारुणभाई ईनामदार , नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड , हानुमंत भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर या मोर्चाला शिवसंग्राम व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) , आणि ईतर सामाजिक तसेच राजकीय पक्षा सह सामिजीक संगठनानी ही भक्कम पाठिंबा दिला. या मोर्चातील मागण्यांचे निवेदन केज तहसीलचे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. लक्ष्मण धस यांना देण्यात आले. व मोर्चा शांततेत पार पडला.

 • शिरूर अनंतपाळ गावात गारासह अवकाळी पावसाने झोडपून मोठे नुकसान

  लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथेअवकाळी पाऊस पडून मोठे नुकसान झाले नुकसान झाले आहे वादळ वाऱ्याने शेतकऱ्याचे गावातील नागरीकराचे बरेच नुकसान झाले आहे रस्तत्यांवरील झाडे पडून लाईट तार तुटून तिन दिवस विज पुरवठा बंद झाला होता तरी काळजी पूर्वक बिराजदार साहेबांनी व संतोष कांबळे यांनी विजेच्या तारेवर पडलेली झाडे फाटे काडून लाईटचे काम करून तार जोडवून…

 • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपूर येथे शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला

  उप.संपादकीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपूर येथे शाळापुर्व तयारी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोकजी लवांडे साहेब आणि उपाध्यक्ष नितिनजी कांबळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपस्थित पालकांचे शाळेच्या वतीने शिक्षकवृंदांनी यथोचित स्वागत केले.मेळावा यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका कांबले मॅडम,सूर्यवंशी मैडम यांनी…

 • breaking news

 • श्री मंगलनाथ संस्थेचे यशस्वी २५ व्या वर्षात पदार्पण….मार्च २०२४ अखेर १३ कोटी ८३ लाख नफा मिळवत घवघवीत यश

  श्री मंगलनाथ संस्थेचे यशस्वी २५ व्या वर्षात पदार्पण….मार्च २०२४ अखेर १३ कोटी ८३ लाख नफा मिळवत घवघवीत यश… माजलगाव/प्रतिनिधीबीड जिल्ह्यातिल सहकार बँकिंग क्षेत्राचा पाया मानल्या जाणाऱ्या श्री मंगलनाथ संस्थने २५ व्या रोप्यमोहोत्सव वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेने कार्यक्षेत्रातील सभासद, हितचिंतक,नागरिक यांच्या विश्वासास सदैव पात्र राहुन मार्च २०२४ अखेर घवघवीत यश संपादन करून १३ कोटी…

 • सादोळा येथील होणारी अवैध वाळू तस्करी, उत्खनन थांबवणार कोण?

  महसूल अधिकारी डोळे झाकून गप्प का? प्रतिनिधी: माजलगाव तालुक्यातील सादोळा गंगेत अवैध वाळू उत्खनन चालू आहे. संबंधित महसूलच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सूचना देऊनही अवैध वाळू तस्करी थांबत नाही याचे गोड बंगाल काय असा प्रश्न सादोळा पंचक्रोशीतील जनता व्यक्त करत आहे. माजलगाव तालुक्यामध्ये वाळूचे अधिकृत एकही टेंडर चालू नाही तरीही वाळू तस्कर थैमान घालतात याकडे महसूल…

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks