मंगेशकर महाविद्यालयात विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२३ परीक्षांना सुरुवात

औराद शहाजानी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या पदवी वर्गाच्या उन्हाळी-२०२३ परीक्षा ह्या दि.१८ एप्रिल पासून विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावरती सुरू झाल्या आहेत. येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या विद्यापीठ परीक्षा केंद्रात बी.ए., बी.काॅम. आणि बी.सी.ए. विद्याशाखेतील नियमित व बॅकलाॅग असे मिळून एकूण ५२६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा विद्यापीठ परीक्षा केंद्रप्रमुख डॉ.प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक केंद्रप्रमुख डाॅ.सचिन हंचाटे, प्रा.प्रसाद ताडमुगळीकर, प्रा.विकास पाटील, प्रा.किशोर सूर्यवंशी, विलास होटकर, व्यंकट शिवणे, विजयकुमार बाबछडे, रूपेश मोरे, राजेंद्र बेलूरे, मारोती पवार इत्यादी परीक्षा विभागात कार्यरत आहेत. पर्यवेक्षण व स्थानिक दक्षता पथकातून कर्तव्य पार पाडत परीक्षेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक सहकार्य करत आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks