मधुरा टाकणखारची सहाय्यक नगररचनाकार अधिकारीपदी निवड

बी. ई. सिव्हिल शाखेत तिला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
माजलगावची सुकन्या कु.मधुरा टाकणखार हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतून सहाय्यक नगररचनाकार अधिकारी वर्ग २ या पदासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचे काल निकाल जाहीर करण्यात आले. कु. मधुरा हीचे पूर्ण शिक्षण पुणे येथे झाले असून बी. ई. सिव्हिल शाखेत तिला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. सध्या ती पुण्यातील सिओईपी या भारतातल्या अग्रगण्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एम. ई. चे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिचे वडिल सुनिल टाकणखार हे बजाज इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत उच्च पदस्थ असून आई सुनिता टाकणखार ह्या जि. प. प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक आहेत. मधुराच्या या अद्वितीय यशाने माजलगाव मधल्या मुलीने स्पर्धा परीक्षेत अजून उंच भरारी घेतली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks