मनोहर (संभाजी) भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

निवेदन

तालुका प्रतनिधी; नितेश कांबळे: शिरुर अनंतपाळ महाविकास आघाडीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन..भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग करुन देशाला स्वातंत्र्य मिळवुन देणारे महापुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, माजी पंतप्रधान स्व. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या बाबतीत व्यक्तीगत पातळीवर टिका करुन या महापुरुषांची सतत बदनामी करुन या महापुरुषांचा अवमान केला आहे तसेच 15 आँगस्ट स्वातंत्र्यदिनी तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्यास विरोध करणारे

मनोहर कुलकर्णी ऊर्फ स्वंयघोषीत संभाजी भिडे गुरुजी

यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करुन सदर ईसमास अटक करण्यात यावी..यांच्या सततच्या या बेताल व्यक्त्यामुळे भारत देशाच्या सार्वभौम प्रजासत्ताक संस्कृतीला ठेस लागत असुन यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.जर या आतिरेकी विचाराच्या माथेफेरू मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे गुरुजी या ईसमास तात्काळ गुन्हा नोंद करुन अटक नाही केल्यास महाविकास आघाडी शिरुर अनंतपाळ च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा निवेदना मार्फत देण्यात आला.या निवेदनावर डाँ.अरविंद भातांब्रे, डाँ.बापुसाहेब पाटील ऊजेडकर, विजयकुमार पाटील निलंगेकर,चक्रधरनाना शेळके,कल्याणराव बर्गे,अशोक कोरे,सतीश शिवणे, संदीप धुमाळे, नगरसेवक.सुधीर लखनगावे, संजय बिराजदार,राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आवाळे,तानाजीराव निडवंचे,

वैशंपायन जागले,रमेश सोनवणे,राजकुमार जाधव,श्रीमती.सरोजा गायकवाड,मधुकर धुमाळे,उमाकांत शिंदे, महादेव खरटमोल,यश दुरुगकर,शुभम आयतनबोणे,बाळासाहेब पाटील,विशाल गिलचे,गोविंद श्रीमंगल,जहीरोद्दीन शेख, शिवदास ऊंबरगे,पठाण ईस्माईल,पठाण नवाज,शत्रुघ्न साळुंखे,सुर्यकांत बानाटे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मोठ्या संख्येने उपस्थीत होते…

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks