महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रचार प्रसारक तालुकाध्यक्ष पदी सिध्देश्वर गायकवाड यांची निवड

माजलगाव /(पृथ्वीराज निर्मळ)
माहिती अधिकार संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माजलगाव प्रचार प्रसारक तालुकाध्यक्ष पदी सिध्देश्वर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय प. तुम्मे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर केली.

सिध्देश्वर गायकवाड हे सामाजिक कार्या मध्ये सदैव अग्रेसर असल्याने ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, मी संपूर्णपणे निरपेक्ष भावनेने काम करणार आहे असे त्यांनी व्यक्त केले आहे. एक नागरिक म्हणून काम करण्यास केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ हा जनसामान्याचा कायदा आहे. या कायद्याचा वापर करून प्रशासन पारदर्शी लोकाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हाच उद्देश आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks