माजलगाव तरुण क्रिकेट ॲकॅडमीचे प्रथमेश गणेश शेटे व सौरभ सुनिल गायकवाड गोवा (अंडर – १९ ) गोल्ड कपसाठी निवड

माजलगाव तरुण क्रिकेट ॲकॅडमीचे प्रथमेश गणेश शेटे व सौरभ सुनिल गायकवाड गोवा (अंडर – १९ ) गोल्ड कपसाठी निवड

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
माजलगाव तरुण क्रिकेट अकॅडमीचे प्रथमेश गणेश शेटे व सौरभ सुनिल गायकवाड यांची नॅशनल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित गोवा गोल्ड कप २०२३ (अंडर-१९ ) साठी निवड करण्यात आलेली आहे. नॅशनल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दि. २५ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान गोवा येथे गोवा गोल्ड कप होणार आहे.

या संघात महाराष्ट्र संघाने सहभाग नोंदवला असुन माजलगावचे प्रथमेश गणेश शेटे व सौरभ सुनिल गायकवाड यांची टि-२० क्रिकेट महाराष्ट्र असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, औरंगाबाद संघात निवड झालेली आहे. या दोघांनीही खेळाडूंनी जिद्द व चिकाटीच्या बळावर स्थानिक स्पर्धेत नावलौकीक मिळवलेले आहे. दोघेही ऑल राऊंडर क्रिकेटर म्हणुन ओळखले जातात. हे दोघेही तरूण क्रिकेट अ‍ॅकॅडमी, माजलगाव येथे प्रशिक्षण घेत असुन त्यांना शेख फेरोज सर, गोविंद टाकणखार, विनोद कोमटवार, मिरवाज खाँ, पेंटर भगवान, घायतिडक, शेख हाय्युम भाई, यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. गोवा येथे होणार्‍या स्पर्धेत महाराष्ट्राकडुन दोघेही प्रतिनिधीत्व करणार आहेत. ही माजलगाव शहरवासीयांसाठी गर्वाची बाब आहे. आपल्या माजलगावकरांचे नाव लौकिक उंचावर नेण्याची बाब आहे. या यशाबद्दल दोघांचेही सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks