माजलगाव नगर परिषदेच्या मालकी हक्काच्या जागेवरवरील अतिक्रमणे काढा -विजय साळवे

मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
नगर परिषदेत परिविक्षाधिन जिल्हाधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून आलेले आय. ए. एस.आदित्य जिवने साहेब यांनी फक्त मुख्य रस्त्यावरील व बी. अँड. सी. आणि एसटी महामंडळाचे जागेवर झालेले अतिक्रमण काढलेले आहे. परंतु नगरपरिषदेच्या मालकी हक्काची जागा आरक्षित केलेल्या आहेत त्या आणखी तशाच आहेत. व उद्या दि. १२ /५/ २०२४ रोजी मा. आय.ए.एस. परिविक्षाधीन अधिकारी आदित्य जीवने साहेब हे त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे पदभार सोडून जात आहेत.

म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक विजय साळवे यांनी निवेदन देऊन अशी मागणी केली आहे की, जि अतिक्रमणे काढली गेली त्या बद्दल आपलं अभिनंदन परंतु नगर परिषदेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत उदाहरणार्थ सर्वे नंबर ३७० सर्वे नंबर ३७२, ३७२ या सर्वे नंबर मधील १३ एकर ३ गुंठे जागाही तत्कालीन राज्यपाल यांनी शहरातील बेघर लोकांना घरकुल बांधून देण्यासाठी नगरपरिषदेच्या मालकीची म्हणून आरक्षित करण्याचे आदेश दिलेले होते.

व ही जागा नगर परिषदेच्या मालकीचीच आहे तसेच तत्कालीन नगराध्यक्ष दिवंगत लक्ष्मणरावजी साबळे साहेब यांनी दिवंगत वसंतराव देशमुख यांच्याकडून त्यांच्या मालकीच्या शेतातील जागाही नगरपरिषद पाणीपुरवठा व पुरवठा विभागासाठी विकत घेऊन नगरपरिषदेच्या मालकीची नोंद केली होती परंतु मध्यंतरी बराच कालावधी लोटल्याने शहरातील भूमाफिया व धन दांडग्या लोकांनी या सर्व जमिनी अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करून आवा च्या सव्वा भावाने विकलेल्या आहेत व या जागेवर गोरगरिबांना घरकुल देणे हे महत्त्वाचे विषय असतानाही धनदांडग्याना विकलेले आहेत.

तरी मा. परिविक्षाधीन जिल्हाधिकारी व नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी वरील आदेश जे आले असतील त्या ऐवजी मा. जिल्हाधिकारी बीड यांनी त्यांना आणखी माजलगावचा कालावधी द्यावा. व राहिलेले पुढील अतिक्रमण काढून माजलगाव शहरवासी यांना या जाचातून मुक्त करावे.

अशी मागणी मुख्याधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व विभागीय आयुक्त श्री. सुनीलजी केंद्रेकर साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्याकडे मागणी केलेली आहे. दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजय साळवे यांनी मागणी ही केलेली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks