माजलगाव बाजार समिती निवडणुकीचे वातावरण तापले, दिग्गज नेत्यांच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )

येथील बाजार समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या असून उमेदवारांनी अर्ज भरून दिनांक २० रोजी काहीनी उमेदवारी अर्ज देखील मागे घेतलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे काम येथील राजकारणातील दिग्गज नेते हे करत आहेत. मोहनराव जगताप यांनी राष्ट्रवादीचे आमदार यांच्याविरुद्ध स्वतःचा भाजपचा पॅनाल उभा केलेला असून त्यांच्याकडून आमदार सोळंके वरती आरोप केला आहे की,

आ.सोळंकेनी स्वतः च्या पुत्र प्रेमापोटी सामान्य कार्यकर्त्याचा बळी देऊन व त्यांचे तिकीट कापून स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली. व त्यांना बाजार समितीमधील १५० झाडांना पाणी देता आले नसून हे झाडे देखील ते जगवु शकले नाहीत. हे काय विकास करणार आहेत असा आरोप केला आहे. तर नितीन नाईकनवरे यांनी तुमच्या पत्नी, मुलगा, भाऊ, पुतण्या अशांना उमेदवारी देत घराणेशाहीतच पदे दिली असून. आता मात्र तुमच्या घरातील कुत्रे – मांजरांना पदे द्यायची बाकी राहिल्याचा आरोप करत हल्लाबोल केला आहे.
माजलगाव बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या प्रचाराचे व आरोपाचे वातावरण तापले आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ.प्रकाश सोळंके यांनी जगताप, नाईकनवरे यांच्यावर आरोप केले होते. त्यास प्रतिउत्तर म्हणून आज (दि.२१) रोजी भा.ज.पा कार्यालयामध्ये दुपारी १२ वाजता भा.ज.पा. नेते मोहन जगताप यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नितीन नाईकनवरे, श्रीकृष्ण सोळंके, संतोष यादव, मनोज जगताप, संतोष यादव, भास्कर कचरे, राहुल जगताप, जगदीश बादाडे, नितीन काळे, वसंतालकुंटे आदी उपस्थित होते.

– *मोहन जगताप* म्हणाले, आ.प्रकाश सोळंके यांनी सांगावे कि माझ्या कुटुंबातील कोणीही उमेदवार नसून, माझ्या जीवा भावाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी मी लढत आहे. परंतू सोळंके हे स्वतःच्या मुलाला सभापती करण्यासाठी हा अट्टाहास करत आहेत. सोसायटी, ग्रामपंचायत निवडणूक न लढवता, सामान्य कार्यकर्त्याचा बळी देत व त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडून स्वतः च्या मुलाला निवडणूक रिंगणात उभे करून सभापती होण्याची मनीषा बाळगत आहेत. मतदारांचे उत्तर त्यांना निवडणूक निकालानंतर कळेल. त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप करू नये.

नितीन नाईकनवरे यांनी आ. सोळंकेवर हल्लाबोल करत, सर्व पदे काय तुमच्यात घरात पाहिजे आहेत काय?, तुमच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य, भाऊ कारखान्यावर, पुतण्या जिल्हा परिषद सदस्य, आत्ता पोरगा सभापती करायचा. आत्ता तुमच्या कुटुंबातील केवळ कुत्र, मांजराला पदावर बसवायचे बाकी राहिले आहे. पाच वर्षात बाजार समितीत तुम्ही केलेले एक विकासाचे दाखवावे. आणि तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करताय जर तुम्हाला आरोपच करायचे असतील तर तुम्ही शिवाजी चौकामध्ये जनता दरबार भरवा एका बाजूला तुम्ही बसा आणि दुसऱ्या बाजूला मी बसतो मग तुम्ही माझ्यावर आरोप करा मी तुम्हाला उत्तर देण्यास तयार आहे. असेल तयारी तर होकार द्या मी तुमच्या प्रश्नांचे व तुम्ही केलेल्या आरोपांचे उत्तर देण्यास सदैव तयार आहे. पण यापुढे अजिबात असे चालणार नाही … यापुढे करारा जवाब दिया जायेगा असा इशाराच नाईकनवरे यांनी आ.सोळंके यांना दिला.
आम्ही पक्षासाठी काम करतो तुम्ही घराणेशाही साठी काम करता

चांगले काम करणाऱ्यास लाथ, मापात पाप करणाऱ्यास साथ…

माजलगाव बाजार समितीमध्ये सभापती संभाजी शेजुळ यांनी चांगले काम केले असे आपणच म्हणता. त्यांनी चांगले काम केले तर तुम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ज्यांनी तुर, हरभरा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक करून. क्विंटल मागे ५०० रुपये हाणले, अशा मापात पाप करणारांना तुम्ही पुन्हा संधी दिली, त्यांनी नाव घेता अशोक डक यांच्यावर केला.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks