माजलगाव शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात

नगर रचनाकार बीड यांच्या डीपी प्लॅन प्रमाणे असणारे रोड व ओपन स्पेस वरील अतिक्रमणे तात्काळ हटवा – विजय साळवे

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
माजलगाव शहरातील रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे व ओपन स्पेस वर करण्यात आलेली नवी व जुने अतिक्रमणे काढण्या बाबत नगरपरिषदेने दैनिकात जाहीर प्रगटन दिलेले होते. मात्र अतिक्रमणधारकांनी याची दखल न घेता अतिक्रमणे तशीच ठेवली त्यामुळे दि.२ मे रोजी माजलगाव नगरपरिषदेच्या वतीने व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे पाडून उध्वस्त करण्यात आली.
माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. आदित्य जीवने यांनी माजलगाव शहरातील रस्त्यावरील व ओपन स्पेस वरील अतिक्रमण धारकांना जाहीर प्रगटनाद्वारे सुचित केले होते की, दि. २ मे ते४ मे दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणे व ओपन स्पेस जागेवरील नवीन व जुनी अतिक्रमणे निष्काशीत करण्यात येतील. तरी न.प. अधिनियम१७९(३) नुसार कोणतीही पूर्व नोटीस देण्याची आवश्यकता नाही तरी सहानुभूतीपूर्वक सर्व अतिक्रमणधारकाने आपआपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत. तसेच शहरांमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. असे जाहीर प्रगटनाद्वारे दैनिकात अतिक्रमण धारकांना सुचवले होते मात्र अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे न काढल्यामुळे नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये रस्त्यावरील अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात केली.

नगर रचनाकार बीड यांच्या डीपी प्लॅन प्रमाणे असणारे रोड व ओपन स्पेस वरील अतिक्रमणे तात्काळ हटवा – विजय साळवे

माजलगाव नगरपरिषद हद्दीतील ओपन स्पेस व नगर रचनाकार बीड यांच्या डीपी प्लाॅन प्रमाणे रोड रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत. मा. मुख्याधिकारी आदित्य जीवने साहेब आपण केलेली कारवाई ही खूप कौतुकास्पद असून आपल्याकडून शहरवासीयांना खूप आशा आहेत जसे की, माजलगाव शहरातील नवीन बस स्थानक शेजारील डॉ. शरद पवार यांच्या रुग्णालयाच्या बाजूने जाणारा नगर रचनाकार यांच्या डीपी प्लॅन प्रमाणे सर्विस रोड हा सरळ तहसील कार्यालयाला जोडला जातो. यापूर्वी सुनील केंद्रेकर साहेबांच्या काळामध्ये या रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आले होते. परंतु आणखी तेथे अतिक्रमण करण्यात येऊन तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तसेच जुन्या बस स्थानका समोरील अशोका लॉज पुढील रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी येथे असणारा जुन्या बस स्टँड कडे निघणारा सरळ रस्ताच अतिक्रमणामुळे गायब झाला आहे. तर एरंडे यांच्या गॅरेज च्या बाजूने भिम नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने तेथील रस्ताच बंद झालेले आहे. तरी मा. जीवने साहेब आपण आज केलेली कारवाई चे जनतेतून स्वागतच होत आहे. परंतु आपण जसे छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचे अतिक्रमण तोडत त्यांना रस्त्यावर आणले. तसेच येथील धन दांडग्यांचे व प्रस्थापितांचे ओपन स्पेस वरील जुने व नवीन बांधकामे जमीन दोस्त करून यांना देखील हिसका दाखवाच. व या तिन्ही रोडवरील बांधकामे तोडून येथील रस्ता शहरवासीयांना रहदारी साठी मोकळा करून द्यावा. अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लवकरच आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विजय साळवे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मराठवाडा अध्यक्ष यांनी दिला आहे.

रस्त्यावर अतिक्रमण करून पान टपरी चालक, फळ विक्रेते व इतर छोटे मोठे उद्योग करून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या गरीब लोकांच्या पोटावर बुलडोजर चालवले तसे येथील प्रस्थापित, धन दांडगे असणारे व ओपन स्पेस वर अतिक्रमण करणाऱ्यांच्या इमारती व बिल्डिंगवर नगरपालिका कधी हातोडा चालवणार याची संपूर्ण शहरवासीयांना उत्सुकता आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks