मी जे बोलेल तेच चालेल, उद्याचा सभापती आमचाच- आप्पासाहेब जाधव

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र)

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून निवडणूक प्रचार शीगेला पोहोचला आहे. येथे भा.ज.पा., राष्ट्रवादी नंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शेकाप, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड हा तिसरा पर्याय म्हणून या निवडणुकीमध्ये आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी बाजार समिती असून येथे दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत आहेत. यामुळे येथील बाजार समितीची निवडणूक ही रंगतदार ठरत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,माजलगाव बाजार समितीवर गेली अनेक वर्ष आ. प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व असून ही बाजार समिती अनेक वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे. व त्यांचे वर्चस्व या बाजार समितीवर एकहाती राहिलेले आहे.

अशातच या बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व त्यांचे मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडी, शे.का.प., संभाजी ब्रिगेड यांनी युती करत या निवडणुकीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी उभी केल्यामुळे ही निवडणूक आणखीनच रंगतदार बोलली आहे. शिवसेना व मित्रपक्ष असलेल्या पक्षांनी शिवसेना कार्यालय माजलगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेत गेली अनेक वर्ष बाजार समितीवर सत्ता असणाऱ्या सत्ताधाऱ्यावर अनेक आरोप केले.

.यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही ना कोणाला पाडण्यासाठी, ना कोणास नडण्यासाठी, आम्ही लढत आहोत फक्त शेतकरी हमाल, मापारी यांच्या हितासाठी या निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव झगडणार आहोत, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास एक रुपया मध्ये जेवण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे परंतु येथील बाजार समितीमध्ये दोन अंकीच शेतकऱ्यांना जेवन उपलब्ध होत आहे असा आरोप आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे . येथे शेतीमाल विक्री करण्यास आलेल्या शेतकऱ्याच्या मापात पाप करण्याचे काम येथील व्यापारी व बाजार समिती सभापती हे करत आहेत. २०१८ मध्ये शेतकऱ्याने पिकवलेला हरभरा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता. परंतु येथे येणारी आवक बघता येथील बाजार समितीने कसल्याही प्रकारची उपायोजना न करता शेतकऱ्यांचा माल उघड्यावर ठेवला व शेतकऱ्यांनी आणलेला हरभरा हा त्यावेळी आलेल्या पावसाने भिजून त्याला कोंब फुटली. मात्र आम्ही याचा पाठपुरावा करत राहिलो व शेतकऱ्यांचा सरसकट भिजलेला, कोंबे फुटलेला हरभरा बाजार समितीस घेण्यास आम्ही भाग पाडले. व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही केले. येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्याने हरभरा विक्रीस आणला त्यावेळेस शासकीय भावापेक्षा २००० रुपये प्रति क्विंटल कमी भावाने व्यापारी हरभरा विकत घेऊन त्याचा साठा करू लागले व नंतर तोच हरभरा व्यापारी शासकीय भावाने शासनास विक्री करु लागले.

यामागे मिळणारा नफ्याचा हिस्सा हा व्यापारी आणि २०१८ चे तात्कालीन सभापती यांच्यामध्ये अर्धा अर्धा होता असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला.यापूर्वी ते म्हणाले की, आम्ही बाजार समितीच्या पूर्ण १८ जागा लढवत नसून फक्त आठ जागा लढवत आहोत. पण कोणत्याही एकाच पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार नसून काही भा.ज.पा.चे तर काही राष्ट्रवादी तर काही आमचे शिवसेना, वंचित, शेकाप, संभाजी ब्रिगेडचे उमेदवार निवडून येणार असून आम्ही त्यांच्याकडे न जाता ते आमच्याकडे येतील तेव्हा सभापती हा आमचा असेल आणि उपसभापती त्यांचा असेल मी बोलेल ते चालेल उद्याचा सभापती आमचाच असेल असे बोलताना त्यांनी उपरोधात्मक सांगितले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks