मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा

मुंबई, दि. १०:- त्याग, समर्पणासाठी ओळखला जाणारा सण ‘बकरी ईद’ अर्थ ‘ईद-उल- अजहा’ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘बकरी ईद’ कडून प्रेरणा घेऊन समाजातील बंधुता, एकमेकांप्रति आदर, एकतेची भावना वाढीस लागावी, हीच अपेक्षा. त्याग, समर्पणातूनच सशक्त अशा समाजाची उभारणी होते, त्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करूया, हीच मनोकामना आणि याच शुभेच्छा! असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks