मौजे चिंचगव्हाण येथे जल जिवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

पाणी पुरवठा योजनेमुळे गावात मुबलक पाणी पुरवठा होणार-आ.प्रकाश (दादा) सोळंके

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
तालुक्यातील मौजे चिंचगव्हाण येथे जल जीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार पांडुरंग उगले, माजी सरपंच वसंतराव उगले, रतन सोळंके, एन. के. शिंदे, अर्जुनराव नाईकनवरे, रामभाऊ आबुज, उपसरपंच राजेभाऊ अर्जुन यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. प्रकाशदादा सोळंके म्हणाले की, पाणी पुरवठा योजनेमुळे गावात मुबलक पाणी पुरवठा होणार असून पाणी पुरवठा योजनेचं काम उत्तम दर्जाचे होईल. तसेच गावातील अनेक प्रलंबित कामे येणाऱ्या काळात मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले. यावेळी पत्रकार पांडुरंग उगले व अॅड. अमोल डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश शिंदे यांनी केले व आ. प्रकाशदादा सोळंके यांचे गावातील विविध विकास कामांना दिलेल्या निधी बद्दल आभार मानले.
यावेळी पत्रकार राजरतन डोंगरे सचिन शेजुळ, नामदेव साळवे, माणिक जाधव, काझी साहेब, वणवे, ग्रामसेवक चव्हाण व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन काळे सरांनी मानले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks