म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

चाकण पुणे जिल्हा:-विशाल जयद्रथ सरवदे
म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या राजरोसपणे जोमात बेकायदेशीर अवैध धंदे सुरू असून त्याचा अवैध धंद्यांना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे पाठबळ असल्याने परिसरातील बेकायदेशीर मटका जुगार लॉटरी सोडत चक्री चिमणी पाकळी तसेच काही हॉटेल वर देशी विदेशी मध्य बेकायदेशीर असल्याचे असे एक ना अनेक गोरख धंदे वाढल्याने त्या भागातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे यामधील काही धंदे पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच पाठीमागे चालू आहे तरी देखील पोलीस स्टेशनच्या पोलीस कुठल्याही प्रकारचे कायदेशीर कारवाई करण्यात दिरंगाई करत असून वसुली बहाद्दर गाडे मार्फत ते बेकायदेशीर रित्या हप्ते वसूल करत आहेत अवैध धंद्यावाल्यांना चांगले सोन्याचे दिवस आले असल्याचे बोलले जात आहेत वरील सर्व चालू असलेल्या बेकायदेशीर अवैध धंद्याचे हप्ते महसूल करण्यात श्री गाडे या यांच्याकडे या भागातील जास्त मोठ्या प्रमाणात वसुली दिली असल्याचे समजते सर्व अवैध धंद्यावरून हफ्ता असल्याचे काम तिथे हे जोमाने करत आहेत तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून वसुली भागात श्री गाडे हे बेकायदेशीर हप्ते जोमात वसूल करत आहे याबाबत नागरिकांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनला व 112 नंबरला वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत तरी देखील म्हाळुंगे पोलीस स्टेशनकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही याउलट अशा अवैध धंदे चालकांन अभय दिले जात असून त्यांचे फोन नंबर वेगवेगळ्या नावाने मोबाईल मध्ये सेव करून ठेवले असून कारवाई करायची वेळ आल्यास त्यांना फोन करून अगोदर सतर्क केले जात आहे आणि तक्रार करणाऱ्या वर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील पोलिसांकडून दिली जात आहे अशाप्रकारे म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे मग संबंधित हप्ते वसुली करणारे गाडे यांच्यावर कधी कारवाई होणार नागरिकांची विचारणा होत आहे

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks