यशवंत हॉस्पिटल व रोटरी क्लब माजलगाव सेंट्रल आयोजित मोफत मूळव्याध तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा- डॉ.यशवंत राजेभोसले.

अशा किचकट आजाराबद्दल जनजागृती करून सहज व मोफत उपचार

माजलगाव/(वर्तमान महाराष्ट्र)
दिनांक १६ जानेवारी २०२४
ग्रामीण व नागरी भागात खानपान व बदलती जीवनशैली यामुळे स्त्री पुरुष तरुण व वृद्धांमध्ये मूळव्याध फिशर भगंदर सारख्या शौचास निगडित आजारांची संख्या वाढत असून त्यावर उपचार घेण्यास रुग्ण सहसा धजावत नाहीत किंवा वेगळ्या मानसिकतेतून उशीर करतात त्यामुळे अशा आजाराची तीव्रता वाढत जाते अशा किचकट आजाराबद्दल जनजागृती करून सहज व मोफत उपचार व्हावेत म्हणून रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल व प. पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद मेडिकल कॉलेज मालीपारगाव यांनी यशवंत हॉस्पिटल समता कॉलनी माजलगाव येथे मोफत मूळव्याध फिशर व भगंदर उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे या आजाराने त्रस्त गरजू रुग्णांनी शिबिरात निसंकोच येऊन तपासणी व उपचार घ्यावेत असे आवाहन आयोजक डॉ. यशवंत राजेभोसले यांनी केले आहे.
डॉ. राजेभोसले हे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी शिबिरात मोफत उपचार करणारे तज्ञ डॉ. युवराज कोल्हे व डॉ. गोपाळ शिंदे यांचा रोटरी क्लब कडून सत्कार करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब सेंट्रल अध्यक्ष रो. इम्रान नाईक सचिव रो. सुनील शिंदे प्रकल्प चेअरमन रो. उमाकांत सोळंके रो. वैजनाथ हुंबे रो.समीर शेख रो.सुदर्शन थावरे व रो. पांडुरंग चांडक रो. अंकुशराव डाके रो. अण्णासाहेब तौर रो. कृष्णा सोळंके इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. प्रभाकर शेटे यांनी केले. दि. १६ जानेवारी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मूळव्याध व फिशर भगंदर तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिर चालू असणार आहे. शिबिरात औषधी तत्सम चाचण्या व फिटनेस साठी लागणाऱ्या तपासणी खर्च वगळता शस्त्रक्रिया डॉ. व दवाखाना खर्च संपूर्ण मोफत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks