राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी पृथ्वीराज निर्मळ

यांचे संघ वाढीसाठी साठी असलेले कार्य, प्रत्येक संघसदस्या प्रति वेळप्रसंगी मदत करण्याची वृत्ती, तळमळ व योगदान..

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हा नूतन कार्यकारिणी दि. ४ मे २०२३ रोजी १ वा. शासकीय विश्रामगृह बीड येथे संपन्न झाली.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ स्थापनेपासून आजपर्यंत संघाशी एकनिष्ठ राहत व संघ वाढीसाठी मोलाचे योगदान देत सुरुवातीपासून माजलगाव तालुका अध्यक्ष पद ते बीड जिल्हा उपाध्यक्ष पद तसेच गतवर्षी बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती होती. परंतु मागील डिसेंबर महिन्यामध्ये बीड जिल्हा कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्यामुळे जुनी कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. आणि आज दि. ४ मे २०२३ रोजी दुपारी १ वा. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे राज्य उपाध्यक्ष भागवत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी पृथ्वीराज निर्मळ यांचे संघ वाढीसाठी साठी असलेले कार्य, प्रत्येक संघसदस्या प्रति वेळप्रसंगी मदत करण्याची वृत्ती, तळमळ व योगदानाबद्दल पृथ्वीराज निर्मळ यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक दशरथ रोडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष भागवत वैद्य, नवनिर्वाचित बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सुर्यवंशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय कुमार वाव्हळ, महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष संतोष जाधव, राज्य सचिव निलेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले.


यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे नूतन बीड जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आत्माराम वाव्हळ, उपाध्यक्ष अशोक जोगदंड, उपाध्यक्ष राम कटारे, सचिव राजकुमार धिवार, कार्याध्यक्ष पृथ्वीराज निर्मळ, संघटक शिवप्रसाद शिरसाट, महाराष्ट्र राज्य गाव विकास ( ग्रामदूत ) उत्तम ओव्हाळ, नवनिर्वाचित माजलगाव तालुका अध्यक्ष अमर साळवे, सचिव राजरतन डोंगरे, उपाध्यक्ष दर्शन डोंगरे, कार्याध्यक्ष विजय डावरे, कोषाध्यक्ष समाधान गायकवाड, परळी तालुका अध्यक्ष अमोल सूर्यवंशी तसेच संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks