रुग्ण हक्क परिषद, पुणे शहर आरोग्य मदत केंद्राचे सोमवारी ताडीवाला रस्ता येथे उद्घाटन – विठ्ठल गायकवाड

रुग्ण हक्क परिषद, पुणे शहर आरोग्य मदत केंद्राचे सोमवारी ताडीवाला रस्ता येथे उद्घाटन – विठ्ठल गायकवाड

पुणे/ प्रतिनिधि: डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आय एस ओ मानांकित आशिया खंडातील पहिली संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषदेची राज्यासह संपूर्ण देशात ओळख आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून रुग्णांच्या न्याय हक्कासाठी कायदा झालाच पाहिजे, म्हणून मोठी चळवळ राज्यात निर्माण झाली आहे. रुग्ण हक्क चळवळ उभी राहत असतानाच मात्र हजारो गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांना देखील दर्जेदार उपचार मिळालेच पाहिजेत, म्हणून लाखो रुपयांचे औषध उपचार पुणे मुंबईसह महाराष्ट्रातील नामांकित हॉस्पिटल मध्ये करण्यात येत आहेत.

रुग्ण हक्क परिषदेच्या राज्यात साडेसातशे हुन अधिक शाखा असतानाच मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता म्हणजेच ताडीवाला रोड येथे लोकनेते दयाराम राजगुरू चारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि नगरसेविका लताताई राजगुरू यांच्या पुढाकाराने रुग्ण हक्क परिषद आरोग्य केंद्राचे उद्घाटन सोमवार दिनांक ६ जून २०२२ रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे, झेनमास्टर भंते सुदस्सन, इंजि. अमोल राजगुरू, युवानेते कुणाल राजगुरू आणि महामाता रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या  प्रेरणा गायकवाड यावेळी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण असणार आहेत, ची माहिती समितीचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक विठ्ठलदादा गायकवाड यांनी दिली. यावेळी बोलताना विठ्ठल गायकवाड म्हणाले की, आपल्या परिसरातील कोणत्याही जाती धर्माचा एकही रुग्ण केवळ पैसे नाहीत म्हणून औषध उपचाराविना आपल्याला सोडून जाऊ नये, याच करिता रुग्ण हक्क परिषदेच्या आरोग्य मदत केंद्राचे उद्घाटन सोमवारी करण्यात येणार आहे, आपण सर्वांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

संपर्क – 8956185702

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks