वंचित बहुजन युवा आघाडीची धारूर येथे शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न

निवडणूकी मध्ये यशस्वी रननिती आखण्या संदर्भात चर्चा

धारूर: (प्रतिनिधी) वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.भगवंत अप्पा वायबसे यांच्या अध्यक्षतेखाली धारूर येथे दि. ११-९ -२०२२ वार रविवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे माजलगाव मतदार संघातील वंचित बहुजन युवा आघाडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत आगामी येऊ घातलेल्या निवडणूकीच्या धर्तीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगर पालिका, नगर परिषद, ग्राम पंचायत, पक्ष संघटन, सभासद नोंदणी, बूथ बांधणी, निवडणूकी मध्ये यशस्वी रननिती आखण्या संदर्भात चर्चा झाली.

त्याचप्रमाणे माजलगाव मतदार संघातील विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली शासनाच्या विविध योजना सर्व सामान्या लोका पर्यंत कशा पोहचतील व त्या योजना सर्व वंचित, उपेक्षित, भटक्या विमुक्ता पर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्व वंचित पदाधिकाऱ्यांची आहे. असे परखड मार्गदर्शन भगवंता अप्पा वायबसे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना केले व त्या नंतर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा प्रवक्ता ज्ञानेश्वर गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे, बीड जिल्हा सह संघटक नितीन बचुटे, बाळराजे सावंत, धारूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब चोले, यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे इतर युवक उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks