वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय, हक्क मागण्यासाठी पत्रकारांचे धरणे आंदोलन

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्यांच्या मागण्यांसाठी गुरुवार दि. ११ मे रोजी जिल्हा भरात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाभरातील विभागीय कार्यालय व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची हाक व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि व्हाईस ऑफ मीडिया बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांनी दिली होती.
त्यांच्या आदेशाचे पालन करत व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ घाईतिडक यांच्या नेतृत्वात माजलगाव तहसील कार्यालयासमोर गुरुवार दि. ११ मे रोजी सकाळी १०वा. माजलगाव तालुक्यातील बहुसंख्य पत्रकारांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

वृत्तपत्रे व माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते.

मात्र माध्यम कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने वृत्तपत्रे व पत्रकारांसाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज रोजी व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून माजलगाव तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेल्या जी.एस.टी. रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा,

कोरोना मध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण (क) वर्ग दैनिक (लघु दैनिक) यांना मारक आहे लघु दैनिकांनाही माध्यम (ब वर्ग) दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात साप्ताहिकांनाही या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. या मागण्यांसाठी दि.१२ मे रोजी तहसील कार्याला समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्या शासन दरबारी पाठवाव्यात आणि आणखी आम्हाला तीव्र आंदोलन करण्याचे पाऊल उचलावे लागू नये असे निवेदन देण्यात आले. यावेळी माजलगाव तालुक्यातील बहुसंख्या पत्रकार उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks