शिरूर अनंतपाळ येथे पंचायत समिती शिरूर अनंतपाळ येथील कृषी विस्तार अधिकारी मा श्री भगवानराव नणंदकर यांचा निरोप समारोह संपन्न झाला

उप.संपादकीय

शिरूर अनंतपाळ तेथे दिनांक २८/२/२०२४ रोजी पंचायत समिती शिरूर अनंतपाळ येथील कृषी विस्तार अधिकारी मा श्री भगवानराव नणंदकर यांचा निरोप समारोह पंचायत समिती शिरूर अनंतपाळ येथे संपन्न झाला मा नणंदकर हे साहित्य, नाटककार,तथा नवोदित कवी लेखकाचे मार्गदर्शक यांची दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी वयोमानानुसार ३४ वर्षांनी सेवा निवृत्त होत आहेत, त्या निमित्ताने पंचायत समिती शिरुर अनंतपाळ येथे मा बी,टी, चव्हाण ( गटविकास अधिकारी)मा श्री कदम,शी,आर, सहाय्यक प्रशासन अधिकारी, मा श्री अमोल गायकवाड,( विस्तार अधिकारी) श्री दिनकर वट्ठे ( विस्तार अधिकारी) मा श्री भागवत वंगे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ता प्रमुख शिरूर अनंतपाळ) मा श्री सोमनाथ स्वामी डिगोळकर( निलंगा विधानसभा प्रमुख) श्रीमती सरोजा गायकवाड ( जिल्हा उपसंघटिका लातूर) अॅड रमेश उंबरगे ( जेष्ठ साहित्यिक) कवी गोविंद श्रीमंगल ( शिवसेना शहर संघटक शिरूर अनंतपाळ) या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख भागवत वंगे यांनी पांढुरंगाची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, जिल्हा उपसंघटिका सरोजा गायकवाड यांनी रंग प्रितीचे पुस्तक देऊन सत्कार केला, कवी गोविंद श्रीमंगल यांनी नणंदकर यांच्या जिवण कार्यावर दोन कवीता सादर केल्या यावेळी पंचायत समितीचे सर्व शासकीय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन शिरूरे यांनी केले तर आभार व्हटे यांनी मानले

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks