शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केले आढावा बैठकीत शिवसैनिकांना मार्गदर्शन

सुषमाताई अंधारे


केज प्रतिनिधि: आज दिनांक 06/09/2022 रोजी केज येथे शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखालील बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत व केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नियोजनात पार पडली यावेळी बैठकीत माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले व उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी पदाधिका-याना संघटक बांधणी सदस्य नोंदणी बुथ निहाय शिवसैनिकांचे नियोजन व गावनिहाय शिवसेना शाखा याविषयी सखोल मार्गदर्शन कले.

तसेच थोड्याच दिवसात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार मराठवाडा संपर्क नेते मा. चंद्रकांत खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा भर शिवसैनिकांचा  मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले  तसेच संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनीही बैठकीत शिवसैनिकांना अनमोल मार्गदर्शन करुन  प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी काम करायचे असेल तरच पद मागावे नसता काम करणाऱ्या शिवसैनिकांना संधी द्यावी व पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे हाथ बळकट करावेत असे आवाहन केले.

तसेच बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी महाराष्ट्र राज्याच्या घडामोडी वर सडेतोड उत्तर दिले यावेळी बैठकीला केज अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित असल्याने सर्वांचे आभार केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी मानले आभार

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks