संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्याचे जाहीर केले.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्याचे जाहीर केले. ही निव्वळ धूळफेक आहे. आज 9 जानेवारी 2024 ला दिल्लीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीची कल्पना आम्हाला होती.

आमच्या सूत्रांकडून आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल चर्चा झाल्याचे समजले. पण निश्चित काय निर्णय झाला ते समजले नाही. जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला अधिकृत आमंत्रण येत नाही किंवा जागा वाटपाच्या चर्चेत बोलावत नाहीत, तोपर्यंत ह्या बातमीत काहीही तथ्य नाही.
वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचीच आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू.

रेखा ठाकूर
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks