सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा 15 सप्टेंबरला समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर मोर्चा!

पुणे, दी. 13 सप्टे 2022, मंगळवार,
वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त महराष्ट्र कार्यालय पुणे येथे मा.खासदार ऍड.डॉ. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्षनाखाली प्रदेशाध्यक्ष डॉ. महेश भारतीय सर यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सन 2019, कोविड 19 पासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, वस्तीग्रहांचे प्रश्न , इ बी सी, केंद्र आणि राज्य सरकारचे शिष्यवृत्ती, कृषी पीएचडी फेलोशिप, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन आणि पेन्शन, पोषण आहार, ओबीसी परराज्य विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, परदेशी जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे बाबत अशा विविध प्रश्नांवर, इयत्ता अकरावीचे प्रवेश हे आरक्षणाच्या आराखड्याप्रमाणे काटेकोर पालन करून करण्यात यावत, यासह विविध विद्यार्थी प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयावर दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी भव्य मोर्चा होणार आहे तरी सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे जिल्हामहासचिव कौस्तुभ ओव्हाळ व बारामती तालुका अध्यक्ष रोहीतराव भोसले यांनी आवाहन केले असे प्रसिद्धी प्रमुख अक्षय गोटेगावकर यांनी कळविले, हे वृत्त आपल्या सुप्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये दैनिकांमध्ये साप्ताहिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks