सादोळा येथील होणारी अवैध वाळू तस्करी, उत्खनन थांबवणार कोण?

प्रतिनिधी: माजलगाव तालुक्यातील सादोळा गंगेत अवैध वाळू उत्खनन चालू आहे. संबंधित महसूलच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सूचना देऊनही अवैध वाळू तस्करी थांबत नाही याचे गोड बंगाल काय असा प्रश्न सादोळा पंचक्रोशीतील जनता व्यक्त करत आहे. माजलगाव तालुक्यामध्ये वाळूचे अधिकृत एकही टेंडर चालू नाही तरीही वाळू तस्कर थैमान घालतात याकडे महसूल चे अधिकारी डोळे झाक करतात नेमके याचे गोडबंगाल काय? असा प्रश्न गावातील नागरिकास पंचक्रोशीतील जनतेला पडला आहे. शासनाने माजलगाव तालुक्यात अद्याप पर्यंत एकही वाळूचे टेंडर निर्माण केले नाही मात्र अवैध वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात निर्माण झाले ही गोष्ट माजलगाव तहसीलदार यांच्या लक्षात का येत नाही एक तर वाळूमाफेकडून माजलगाव तहसील, तथा महसूल विभागाला मोठ्या प्रमाणात अवैध महसूल मिळत असावा किंवा सदर वाळू तस्कर मोठ्या राजकारणाचे हितचिंतक असावेत याशिवाय तहसीलदार महसूल प्रशासन गप्प बसत नाही अशी चर्चा अशी सादोळा गावासह संपूर्ण माजलगाव तालुक्यात चालू असून माजलगाव तालुका अनेक प्रकरणात गाजत आहे. अवैध वाळू तस्करी अवैध धंदे असतील या प्रकरणाला आळा घालणारा कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न माजलगाव तालुक्यातील जनतेला पडला आहे प्रशासन अवैध वाळू तस्कर किंवा अवैध धंदेवाले यांना जर आवर घालू शकले नाहीत तर माजलगाव महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभा राहील अशी चर्चा सर्वसामान्य मधून व्यक्त केली जात आहे. आमची नाईट राऊंड चालू आहे त्यादरम्यान संबंधित अवैध उत्खनन केलेले वाहन त्या वाहनांवर आम्ही कारवाई करू परंतु त्यावेळेस ते वाळूमाफिया फरार झालेलेअसतात..बालक कोळी. पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस ठाणे माजलगाव माजलगाव तहसीलदार यांना फोन द्वारे विचारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही रात्रंणदिवस वाळू माफिया सादोळा इथून वाळु तस्करी चालू असून मी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना वारंवार सांगून सुद्धा कारवाई करण्यात आली नाही अखेर त्यांना लेखी स्वरूपात निवेदन सुद्धा दिलेले आहे परंतु कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.. ऋतिक सोळंके

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks