सामाजिक समता अभियानच्या “बहुजन नायक पुरस्कार वितरण समारंभ ” व युवक परिषदेस उपस्थित राहा – अरविंद लोंढे

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
तथागत गौतम बुद्ध, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने सामाजिक समता अभियान माजलगाव शाखेच्या वतीने बहुजन नायक पुरस्कार वितरण समारंभ व युवक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम दि. २२ मे २०२२ रविवार रोजी सकाळी ११ : ०० वा. व्यंकटेश हॉटेल, माजलगाव या ठिकाणी संपन्न होणार आहे.
या पुरस्काराचे वितरण मा. संदीप भैय्या उपरे (राज्य अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन सामाजिक समता अभियान चे अध्यक्ष प्रवीण कुमार डावरे व कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठल जाधव करणार आहेत .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक समता अभियान चे महासचिव प्रा.शशिकांत जावळे राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बाळासाहेब गव्हाणे, प्रा.डॉ. संजय सावते , प्रा.ईश्वर डोंगरदिवे , चरणराज ढोकणे , प्रा. नारायण घोलप,प्रा.अमोल वाघमारे , प्रा.डॉ.आत्माराम झिंजुर्डे, प्रा.डॉ. नवनाथ पवळे आदी मान्यवर राहणार आहेत तर नानासाहेब घोडके, अशोक राठोड, प्रभाकर साळवे , जालिंदर वाहुळ,प्रा. धम्मानंद बोराडे, ऍड. राहुल निसर्गंध, डॉ. सचिन निसर्गंध, अशोक मगर ,प्रमोद साळवे, राहुल टाकणखार सर, सिताराम साळवी, गोरख काकडे , भानुदास टाकणखार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे . फुले शाहू आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी प्रामाणिकपणे व सक्रियतेने जे युवक कार्य करीत आहेत.अशा कार्यकर्त्यांचा गुणगौरव करण्यासाठी सामाजिक समता अभियान च्या वतीने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. सदर पुरस्काराचे हे प्रथम वर्ष आहे. तसेच युवकांमध्ये राजकीय, सामाजिक जनजागृती करण्यासाठी युवक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे मुख्यसंयोजक पंकज कुमार साळवे व अरविंद लोंढे असून स्वागताध्यक्ष विजय राऊत असणार आहेत. बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक अॅड. महादेव जाधव, विशाल ससाने, सतिश गायकवाड, नारायण मोरे, चेतन मोरे ,प्रदीप साळवे, जीविक जावळे, तय्यब मिस्त्री, रवी पवार ,मंगेश डोंगरे, अतुल जावळे, बाबासाहेब लांडगे, सोनु कदम ,अशोक लांडगे, शाहू गायकवाड आदींनी केले आहे .

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks