स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त बनसारोळा गावात माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न.

वर्तमान महाराष्ट्र न्यूज कार्यकारी संपादकाचे स्वागत

केज: तालुक्यातल्या बनसारोळा गावात स्वतंत्र्याच्या 75 अमृत महोत्सवा निमित्त ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम माजी सैनिक कुंडलिक बप्पा गोरे यांच्या हस्ते घेण्यात आला.या ध्वारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी व महाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदर्श माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून75 वर्ष पुर्ण झाले आहेत. याच 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त भारत देशाची सेवा करून गावाकडे परतलेल्या माजी सैनिकांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित आदर्श माध्यमिक विध्यालयातील दोन विद्यार्थिनी परिक्षात उच्च गुण घेतल्या बद्दल त्याचा ही सत्कार करण्यात आला.तसेच केज तालुक्याचे भुमिपुत्र माजी आमदार विनायकजी मेटे यांच्या दुःख निधन झाल्यामुळे त्याना बनसारोळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने व बनसारोळा गावकऱ्याच्या वतिने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बनसारोळा गावचे धडाडीचे पत्रकार म्हणून ओळख आसणारे धिवार राजकुमार याचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गोरे महेंद्र गायकवाड सतिष गोरे बाळासाहेब जाधव व सामाजिक कार्यकर्ते जयचंद धायगुडे धिरज काकडे ग्रामरोजगार सेवक गोविंद गोरे निलेश पवार सतोष धायगुडे पोपट सोनके अन्य गावकरी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks