हिवरा (बु.) येथे पंकजपाल महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम

पंकज पाल महाराज यांच्या समाज प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन

माजलगाव/ ( वर्तमान महाराष्ट्र )तालुक्यातील हिवरा( बु.) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त समाज प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक पंकज पाल महाराज यांच्या समाज प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन दी.२८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. करण्यात आलेले आहे .

अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष व आयोजक यांनी केली आहे. पंकज पाल महाराज हे प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य आहेत तरी सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी या समाजप्रबोधनपर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व समाज जनजागृतीचा भाग होऊन जयंतीची शोभा वाढवावी.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks