मा. मुख्याधिकारी साहेब आपण केलेली अतिक्रमण हटाव मोहीम फार कौतुकास्पद आहे!

मात्र आपल्या कार्यालयातील कार्यालयीन अतिक्रमण कधी हटवणार..?

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
माजलगाव शहरास नव्याने लाभलेले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री आदित्य जीवने आपण अतिक्रमणित जागेवरील अतिक्रमण हटवून शहरास व शहरवासीयांना मोकळा श्वास करून दिला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवत व अतिक्रमण करून रोडवरील जागेचा ताबा करत रहदारीस या अतिक्रमणामुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता.

परंतु आपण कसल्याच दबावास बळी न पडता शहरातील मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे तोडून एक प्रकारे शहरवासीयांच्या मनामध्ये आपण वेगळेच स्थान निर्माण केले आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. आपण केलेल्या या कार्याबद्दल येथील नागरिकांतून आपले अभिनंदन व कौतुक देखील होत आहे.
परंतु मुख्याधिकारी साहेब आपल्या नगर परिषदेमध्ये गेली अनेक वर्षापासून सावळा गोंधळ बघावयास मिळतो आहे. येथील कर्मचारी हे आपल्या नियुक्तीच्या जागेवर न बसता ते इतर कोणत्याही पोस्टवर काम करत आहेत. येथील वॉचमन, शिपाई, सफाई कामगार हे नेमणूक झालेल्या पोस्टवर न काम करता कोणी कोणत्याही ठिकाणी काम करत आहेत.

यामुळे आपल्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार वाढीस प्रोत्साहन मिळत आहे. या कर्मचाऱ्यांनी जणू काय कार्यालयामध्ये नियुक्तीचे ( पोस्टचे ) अतिक्रमण केले की काय असा प्रश्न येथील जनतेस भेडसावत आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
यामुळे मुख्याधिकारी साहेब आपण येथील कर्मचाऱ्यांना शिस्त लावाच! ज्याच्या त्याच्या पदनियुक्तीप्रमाणे त्यांची जागा त्यांना दाखवा व त्यांना शिस्त लावून येथील अतिक्रमण हटवा व तो स्पेस मोकळा करा असे येथील नागरिकांमधून बोलले जात आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks