Beed: व्याजाचे पैसे भरून थकला; शेवटी सख्ख्या भावाचाच काटा काढला

मित्रांच्या मदतीनं सख्ख्या लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची केली हत्या

Beed: प्रतिनिधी, विशाल जयद्रथ सरवदे:

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांच्या मदतीनं सख्ख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मनोहर पुंडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी गेवराई शहराजवळील मनारवाडी शिवारात मनोहर पुंडे यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला आहे. बीड पोलिसांची मोठी कारवाई घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मनोहर पुंडे याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी जवळ पैसे नसल्यानं तो दुसऱ्याकडून व्याजानं पैसे घेत होता. त्या पैशांमधून तो दारू पीत होता. मात्र हे पैसे त्याच्या लहान भावाला परत करावे लागत होते. सतत व्याजाचे पैसे भरावे लागत असल्यानं याला कंटाळून आरोपी दर्शन पुंडे यांनं आपल्या मोठ्या भावाचा मित्रांच्या मदतीनं खून केला. पाच जणांविरोधात गुन्हा दाखल मनोहर पुंडे याचा मृतदेह शहरापासून जवळच असलेल्या मनारवाडी शिवारात आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सारखे व्याजाने पैसे घेत असल्यानं लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची मित्रांच्या मदतीनं हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks