लातूर: शिरूर अनंतपाळ येथील वि.म चे उप. अभियंता जोंधळे; यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवेदन

लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने व जिल्हा संघटिका डॉ शोभाताई बेंजरगे, यांच्या आदेशाने

ता. प्रतिनीधी नितेश कांबळे: दि. २८ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विधुत ग्राहकांना सतत चुकिचे बीले देऊन ज्यादा वसुली होत असल्याचे निवेदन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येथील उप अभियंता जोंधळे साहेब यांना लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने व जिल्हा संघटिका डॉ शोभाताई बेंजरगे, यांच्या आदेशाने देण्यात आले यावेळी शिरुर अनंतपाळ ता प्रमुख भागवत वंगे, लातूर जिल्हा उपसंघटिका श्रीमती सरोजा गायकवाड, शहर प्रमुख सतीष शिवणे,कवी गोविंद श्रीमंगल, ता उपाध्यक्ष रविनाथ तांबोळकर,दशरथ जगताप साहेब,प्रशांत शिरूरे, गोविंद शिंदे, बापु खटके, शिवाजी आवाळे,नागनाथ साकोळकर इत्यादी शिवसैनिक उपस्थीत होते.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विधुत ग्राहकांना वारंवार विजेचे चुकिचे बिल देऊन त्यांची वसुली केली जाते. आहे चुकिच्या बिलाची चौकशी केली असता हे बील बरोबर आहे असे सांगून त्यांना माघारी पाठवतात व ते चुकीचे बिल भरले नाहीतर लगेच लाईनमन ला सांगुन वीज कनेक्शन कट करतात.

तसेच तालुक्यात सध्या पाऊस नसल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी शेतातील पिकांना वाचवण्यासाठी पाणी देण्याकरीता धावपळ करत आहेत पण त्यांना पाणी देण्यासाठी शेतातील पिकांना वाचविण्यासाठी पाणी देण्याकरीता धावपळ करत आहेत पण त्यांना पाणी देण्यासाठी विधुत मोटारिंना उच्चे दाबाचा विधुत पुरवठा होत नाही तो पुरवठा सुरळित करुन घ्यावा.

यांच्या वागणुकीमुळे ग्राहक खुप वैतागला आहे वारंवार होत असलेल्या बिलाची चौकशी करुन हे काम ज्या एजन्सीला दिले आहे त्या एजन्सीची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करा नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदना द्वारे देण्यात आले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks