Pune: राजस्थान येथुन अंमली पदार्थाची विक्री करणा-यासाठी आलेल्या इसमाकडुन ५७,६६,२००/- रु किमतीचा हेरॉईन व मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ जप्त केला.

५७,६६,२००/- रु किमतीचा हेरॉईन व मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ जप्त केला.

पुणे दि.२५ अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडुन राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत पथकाकडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील अधिकारी व अंमलदार हे विमानतळ पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २४/०८/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना पो.शि. मांढरे यांना मिळालेल्या माहिती वरून रामचंन्द्र काळे नगर, लोहगांव, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी

इसम नामे गोपिचंद रामलाल बिश्नोई, वय २८ वर्षे, सध्या राहणार रामदेव फर्निचर, पी.सी.एस. चौक, मरकळ रोड, च-होली खुर्द, पुणे मुळ गांव पोस्ट पुनासा, ता भिनमाल, जि. जालोर, राज्य राजस्थान याच्या ताब्यात ३१२ ग्रॅम ६० मि.ग्र. हेरॉईन ४६,८९,०००/- रु कि.चा व ५३ ग्रॅम ८६० मि.ग्र. मॅफेड्रॉन (एम.डी.) १०,७७,२०० /- रु. कि.चा असा एकुण ५७,६६,२००/- रु. कि.चा हेरॉईन व मॅफेड्रॉन (एम.डी.) असा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द विमानतळ पो.स्टे. येथे गु.र.नं. ४४५/२०२३, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविन्द्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुंखे, साहिल शेख, नितीन जगदाळे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड व महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर यांनी केली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks