कांदा अनुदान व हमीभाव तात्काळ जाहीर करा – मुक्तीराम आबुज

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हातील माजलगांव येथे तहसीलदार व उपजिल्हाधिकारी कार्यालय माजलगांव येथे आज दि.०२ / ०३ / २०२३ रोजी कांदा अनुदान व हमीभाव तात्काळ जाहीर करावा व पंधरा दिवसामध्ये जर अनुदान, कांदा, कापूस हमीभाव देण्यात यावा व अनुदान वाटप करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष मुक्तीराम आबूज यांच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदार व उपजिल्हाधिकारी माजलगाव देण्यात आला आहे. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष कल्याण गवते, माजलगावक तालुका उपअध्यक्ष दत्ता सातपूते, माजलगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख कृष्णा सरवदे, माजलगांव तालुका विधान सभा अध्यक्ष नितीन काडूरे आदी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks