शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी येथील अडीच एकर च्या वर ऊस जळाला शेतकऱ्याचे लाखो चे नुकसान

लातूर जिल्हा प्रतिनिधी: जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी येथील पंडितराव कारभारी यांच्या शेतातील शार्टसर्किट होऊन जवळपास अडीच एकर उस जळाला आहे यात लाखोचे नुकसान झाले आहे.

साकोळ पासून जवळच असलेल्या शिवारातील सर्वे नंबर ३२ मध्ये उभ्या असलेल्या उसाच्या वरून वीज वितरणच्या तारा गेल्या आहेत. या तारामध्ये स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्याने पंडितराव कारभारी यांच्या ऊसाला आग लागून जवळपास अडीच एकरवरील ऊस जळाला आहे यात अंदाजे तीन ते चार लाख रुपये नुकसान झालेले आहे. ही बाब तहसील प्रशासनाल कळवली असता जळालेल्या उसाचा पंचनामा तहसील प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

प्रत्येक वर्षी या भागात वीजवितरणाच्या कारभारामुळे उस जळत आहे. तरी वीजवितरण कंपनी लक्ष देत नाही. अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks