आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )

येथील आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
जागतिक योगा दिनाचे प्रात्यक्षिक व महत्त्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व तसेच सहशिक्षकांनी मार्गदर्शन करताना व योगा बद्दल माहिती देत यापासून आरोग्य विषयक महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले व लहान मुलांकडून विविध प्रकारच्या योगा व कवायती करून घेतल्या. नियमित योगा केल्याने आपले आरोग्य हे निरोगी राहते, यामुळे आपल्या शरीराला व बुद्धीला चालना मिळते आपले आरोग्य निरोगी होण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून २१ जून २०१५ पासून योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी विद्यार्थ्यांना योगा विषयक माहिती देऊन त्यांच्याकडून कपाल भारती, वज्रासन, शवासन, व्याघ्रासन, व इतर कवायती जमतील तशा विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या यामुळे शाळेमध्ये व लहान लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास शिवराज प्रतिष्ठान संचलित आयडियल इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष प्रा. विनायक सरवदे, सचिव मनोहर घुले, कोषाध्यक्ष प्रा. लक्ष्मण गिरी संचालक, शिवाजी जाधव, अँड. कुंभार सर अॅड. सुरेश सोळंके, अॅड. नंदकिशोर खळगे, जयदीप कुंभार, यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील शिक्षक वृंद सौ. उषा निर्मळ मॅडम, सौ. प्राची कुलकर्णी मॅडम, प्राची तौर मॅडम, सौ. उषा थावरे मॅडम, स्नेहल सोळंके मॅडम, उदावंत मॅडम, रेणुका आनेराव मॅडम तसेच महादेव गिरी यांचे मोलाचे योगदान लाभले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks