माजलगाव: खाजगीकरणा सह कंत्राटीकरणाच्या आदेशाची कास्टट्राईब ने केली होळी.

Castetribe defied privatization and contracting mandates.

माजलगाव /पृथ्वीराज
राज्यातील रिक्त अधिकारी व कर्मचारी पदे कंत्राट भरती करिता ९ कंपन्यांना दिलेली नियुक्ती व सरकारी शाळा दत्तक देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासन उद्योग,उर्जा कामगार व खनीज कर्म विभाग शासन निर्णय क्र.२०१७ / प्र.क्र. / ९३ काममार ८ दिनांक ०६ सप्टेंबर २०२३ तसेच दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व सरकारी शाळा दत्तक देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा.
या मागणी साठी महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब कल्याण महासंघ माजलगाव च्या वतीने २२ सप्टेंबर शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन निर्णयाची होळी करून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यात कास्टाईबच्या तालुकाध्यक्ष सह सर्वच पदाधीकारी, सर्व शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या‌ तसेच तालुक्यातील सामाजीक, राजकिय नेते, कार्यकर्ते, कर्मचारी व नागरीकांनी उपस्थिती लावली होती .
या स्वाक्षरी अभियानाची प्रत इमेल व्दारे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार असून शासनाने याची दखल न घेतल्यास महासंघाच्या वतीने तिवृ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks