दै. कार्यारंभ चे संपादक शिवाजी भाऊ रांजवण यांच्या हस्ते कुडो कराटे क्लासेस चे उद्घाटन

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ)

माजलगाव शहरांमधील राजस्थानी विद्यालयामध्ये दि. ३१ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले कराटे क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले कुडो कराटे क्लासेसचे उद्घाटन दै. कार्यारंभचे मुख्य संपादक शिवाजी भाऊ रांजण यांच्या हस्ते माजलगाव शहरा मधील राजस्थानी विद्यालयात करण्यात आले असून. सेनसाई राजू बासीत शेख यांच्या माध्यमातून कराटे क्लासेस चालवण्यात येणार आहेत.याबाबत थोडक्यात वृत्त असे की, माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील राजू बासीद शेख हे गेल्या अनेक वर्षापासून कराटेच्या माध्यमातून पात्रुड येथील ग्रामीण भागातून कराटे अकॅडमी चालवत असत व पात्रुड येथील मुला मुलींना व पात्रुड परिसराच्या आजूबाजूस असणाऱ्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना व विद्यार्थ्यांना कराटे क्लासेसच्या माध्यमातून तसेच शाळेतील मुला मुलींना कराटे प्रशिक्षण देत स्वसंरक्षणाचे धडे देत अनेक मुलं-मुली विद्यार्थी यामध्ये त्यांनी पारंगत केलेले आहेत.गेल्या अनेक वर्षापासून माजलगाव सारख्या शहरांमध्ये आपली कराटे अकॅडमी असावी हे स्वप्न व ध्येय ऊरात बाळगत होते. त्यांनी माजलगाव शहरातील राजस्थानी शाळेमध्ये कुडो कराटे क्लासेस चालू करून आपले ध्येय व स्वप्न साकार केले असून.कुडो कराटे क्लासेसचे उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दै. कार्यारंभ चे मुख्य संपादक शिवाजी भाऊ रांजवण हे होते, तर उपाध्यक्ष म्हणून मस्जिद भाई हे होते, पत्रकार किशोर प्रधान, प्रमुख पाहुणे म्हणून हिंद टायर ग्रुप परभणीचे फिरोज खान, पात्रुड ग्रामपंचायत चे माजी सरपंच एकनाथ मस्के, मौलाना युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस, ऑल इंडिया जनेतूल कुरेशी तालुका अध्यक्ष आखिल कुरेशी, आसेफ खान, अबिद मोमीन व विद्यार्थी पालकांच्या प्रमुख उपस्थितीत कोडक कराटे क्लासेस चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धैर्यशील ढगे यांनी केले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks