मंगेशकर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

मंगेशकर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजराऔराद शहाजानी :- येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.विजयकुमार पवार यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मडोळय्या मठपती, अनिल डोईजोडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, प्रा.दुर्गादास सबनीस, प्रा.विजयकुमार हंडे, मोईन आळंदकर, विलास बिरादार, रूपेश मोरे यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks