राज्य शासनासह पुणे पालिकेला आरटीई प्रवेश प्रक्रियेचा पडला विसर?

लवकर प्रवेश प्रक्रिया पारदर्शी सुरु करण्याची अक्षय गोटेगावकर यांची मागणी!

पुणे / प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे, यंदा राज्य शासनाला ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियाच बंद पाडण्याचा डाव आहे की काय ? असा राज्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

ज्ञानमाता माहिती अधिकार कार्यकर्ते नागरिक समूह तथा प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते अक्षय गोटेगावकर यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शिक्षण संचालक यांना
निवेदन देत आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावावर अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे, २०२४-२५ या शैक्षणिक वषार्तील ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. परिणामी, हजारो पालक चिंतेत असून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार
याची पालक वाट पाहत आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार ही प्रक्रिया वेळेत होणे गरजेचे आहे जेणे करून विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नयेत परंतु वारंवार शिक्षण विभागाकडून होत असलेल्या विलंबामुळे शासनच शिक्षण हक्क कायद्याला छेद देत बालकांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव आखत तर नाहीना असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणात गरीब श्रीमंत असा भेद भाव न होता गरिबांच्या मुलांना
देखील चांगले शिक्षण मिळावे या हेतूने हा कायदा अंमलात आणला मात्र दर वर्षी उशिराने होणाऱ्या या प्रवेश प्रक्रिये मुळे जून पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाहीत परिणामी त्यांना या प्रवेशाला मुकावे लागते आणि आरटीई प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात. आपल्या पाल्याचे आरटीई प्रवेश व्हावा यासाठी राज्यभरातील पलक प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत तेव्हा लवकरात लवकर आरटीई प्रवेश प्रक्रिया हि पारदर्शकपणे सुरू करावी अशी राज्य शासनाला व पुणे पालिकेला निवेदनात मागणी ज्ञानमाता माहिती अधिकार कार्यकर्ते नागरिक समूह तथा प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते अक्षय गोटेगावकर यांनी केली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks