राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांच्या तुघलकी निर्णया विरोधात धरणे आंदोलन

शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान

वर्तमान महाराष्ट्र / पृथ्वीराज निर्मळ
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी २६ जुन २०२३ रोजी जिल्ह्यातील तांडा / वस्ती वरिल जिल्हा परिषद शाळेतील ०१ ते २० पटसंख्या असणाऱ्या द्विशिक्षकीय शाळेतील एका शिक्षकाची पटसंख्या जास्त असणाऱ्या इतर जिल्हा परिषद शाळेत निव्वळ तात्पूरत्या स्वरूपात प्रतिनियुक्ती आदेश पारित केले आहेत. या अशा निर्णयामुळे तांडा, वस्ती वरिल शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून हे विद्यार्थी कायमचे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जातात की काय असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्या साठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पंचायत समिती कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गटविकास अधिकारी यांच्या मार्फत दिला होता. त्या अनुषंगाने दिनांक २४ जुलै सोमवार रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पंचायत समिती कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलन गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या लेखी मध्यस्थीने तुर्तास रद्द करण्यात आले आहे.
परंतु जो पर्यंत तांडा, वस्ती वरिल जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकाची प्रतिनियुक्ती आदेश रद्द करण्यात येत नाही व
ज्या जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी पटसंख्या जास्त आहे परंतु शिक्षक संख्या कमी आहे अशा जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन आदेशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात यावी किंवा शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार डिएड/ बीएड धारकांना प्राधान्याने नियुक्ती देण्यासाठी कार्यवाही अवलंबवावी व गोर गरीब शोषित वंचित शेतकऱ्यांच्या मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळू नये यासाठी घेतलेला तुघलकी निर्णय मागे घ्यावा अन्यथा आपल्या दरबारी तिवृ धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रिय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमर साळवे सह राजरतन डोंगरे , दर्शन डोंगरे , विजय डावरे यांनी या वेळी दिला आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks