Latur: शहरातील श्री नुतन विद्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्ताने विविध शुर वीर आणि महापुरुषाचे देखावे विद्यार्थ्यी, नागरीकांनी अनुभवली

तालुका प्रतिनिधी नितेश कांबळे

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ: शहरातील श्री नूतन विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवीवर्षा निमित्य विविध देखावे सादर करण्यात आले याचे दर्शन विद्यार्थ्यी, पालक व नागरीकांना लाभले आहे. शहरातील श्री अनंतपाळ नुतन विद्यालयाच्या वतीने मराठवाडा मुक्तीचा आमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने शाळेच्या प्रांगणात माजी मंत्री तथा आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हास्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मैदानात विविध शुरवीर व महापुरुषाचे देखावे सादर झाले याचा अनुभव विदयार्थी, पालक, नागरीकानी भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. यावेळी माजी मंत्री आ, संभाजीराव पाटील, आरोग्य दूत नामदेवराव कदम, जेष्ठ शिक्षण तज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी, नगराध्यक्षा मायावती धुमाळे, उपनगराध्यक्षा सुषमाताई मठपती, तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, मुख्यधिकारी मंगेश शिंदे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, शिवाजी मादलापुरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्यासह परिसरातील पालक, शिक्षक, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks