स्मार्ट किड्स प्रिस्कूल मध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला योगदिन उत्साहात साजरा

श्री. रविशंकरजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण..

माजलगाव / (पृथ्वीराजनिर्मळ)
वाल्मिकी सेवाभावी संस्था संचालित स्मार्ट किड्स प्रिस्कूल माजलगाव या शाळे मध्ये दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी योग गुरु राज्य खेळाडू पायल गिल्डा व स्वेता भारस्कर शाळेचे अध्यक्ष गोपाळ जोशी, बाळू जोशी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौं. अंकिता रुद्रवार, अनुजा गिलाणकर, सपना आठवले, माधवी बोबडे व काही विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते. शाळेच्या अध्यक्षांच्या हस्ते श्री. रविशंकरजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून योगासनाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी योगासनाचे विविध प्रकार कपालभारती, भुजंगासन, शवासन, सर्वांगासन, सुखासन, वज्रासन, पवन मुक्तासन, ताडासन, व्याघ्रासन, वक्रासन, त्रिकोणासन, व अनुलोम विलोम, बस्त्रीका असे विविध प्रकार जसे जमतील तसें या लहान लहान चुमुकल्या विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकाकडून करून घेण्यात आले. व दैनंदिन जीवना मध्ये योगासनाचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच शरीराची, वयक्तिक स्वछता याबद्दल माहिती देण्यात आली.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks