अंबाजोगाई तालुक्यात ग्रीन बेल्ट साकारलाय; ऊसाचा प्रश्न कायमस्वरूपी मीवटण्यासाठी अंबासाखर ला आणखी सक्षम करणार – धनंजय मुंडे

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे 1 कोटी 38 लाख रुपयांच्या विकासकामांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण, तर सुमारे 5 कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न.

गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणखी 50 लाख निधी देण्याची ना. मुंडेंची घोषणा!

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई तालुक्यातील राडी आणि परिसर मांजरा नदीच्या पाण्याने सुपीक आणि ग्रीन बेल्ट म्हणून विकसित होतो आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या उसाची अडचण होऊ नये म्हणून अंबासाखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला घेतला. या कारखान्याचे अपग्रेडेशन करून पुढच्या सिझनला आणखी सक्षम बनवणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे बोलताना म्हटले आहे. राडी येथे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय इमारत – 30 लाख, सामाजिक सभागृह – 20 लाख, रिंग रोड सिमेंट रस्ता 20 लाख, राडी-वाघाळा रस्ता डांबरीकरण – 10 लाख, रस्त्यावरील पूल – 20 लाख, स्मशानभूमी – 5 लाख, जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत – 15 लाख, जिल्हा परिषद शाळा पेव्हर ब्लॉक – 5 लाख, शाळा अंतर्गत रस्ता – 10 लाख, स्मशान भूमी पेव्हर ब्लॉक – 3 लाख अशा सुमारे 1 कोटी 38 लाख रुपयांच्या पूर्ण झालेल्या कामांचे सोमवारी (दि. 23) सायंकाळी आयोजित कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राडी ते सुगाव रस्ता – 2.50 कोटी, कब्रस्तान संरक्षण भिंत – 5 लाख, बुद्ध विहार – 20 लाख, पाणंद रस्ते – 1 कोटी 84 लाख, अंगणवाडी – 12 लाख, राडी – वाघाळा रस्ता – 15 लाख आणि 25/15 योजनेतून सभागृह – 20 लाख असे सुमारे 5 कोटी रुपयांच्या विकासकामांचे ना. मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. राडी गावाने आणि परिसराने आम्हाला खूप काही दिले. इथल्या मातीत सुपीकता आहे, इथल्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक विकास व्हावा, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी बोलताना म्हणाले. राडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी 30 लाख रुपये निधी मागितला होता, या कामासाठी 30 नाही तर 50 लाख रुपये निधी देण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीर केले. याप्रसंगी आ. संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, शिवाजीराव सिरसाट, डॉ. नरेंद्र काळे, बबन भैय्या लोमटे, विलास काका सोनवणे, आबासाहेब पांडे, गुलाबराव गंगणे, एकनाथ कातळे, शरद गंगणे, विलास बापू मोरे, उत्तमराव गंगणे, बी सी गंगणे, बाळासाहेब गंगणे, दत्ताभाऊ गंगणे, मनोज गंगणे, वजीर पठाण, सतीश गंगणे, रणजित चाचा लोमटे, तानाजी देशमुख, मधुकर आगळे, गुणवंत आगळे, अरुण जगताप, महेश जगताप, रावसाहेब आडे, काशिनाथ आडे, शुभम जगताप, सुधाकर शिनगारे, वहिद पठाण, महादेव वाघमारे, इजाईल शेख, विलासदादा पाटील, प्रभाकर गंगणे, गंगाधर गंगणे, पाशा मामु, सुभाष बनसोडे, रावण बापू, विकास गंगणे, विलास जाधव, हनुमंत कोलगिरे, त्रिंबक गंगणे, देसाई आबा, वामनराव गंगणे, महारुद्र कोलगिरे, बब्रुवान बनसोडे, सुहास पाटील, सुभाष गंगणे यांसह आदी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks