अजय देवरे लातूरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक- वर्तमान महाराष्ट्र

लातूर : पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांची बदली झाल्यानंतर लातूर जिल्हयाचे नुतन पोलिस अधिक्षक म्हणून सोमय मुंडे यांनी पदभार घेतला. त्यानंतर लातूरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांची नागपूर शहर पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक अजय लक्ष्मण देवरे येणार आहेत. गेल्या १० ते १५ दिवसात लातूर जिल्हा पोलिस प्रशासनात बदल होताना दिसून येत आहेत. बदली झालेल्या अधिका-यांना तात्काळ रूजू होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks