अनुदानित विनाअनुदानित शाळांसह इंग्रजी शाळानी विद्यार्थ्यांना प्रवेशा पासून वंचित ठेवू नये-भारत तांगडे.

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
तालुक्यातील अनुदानित विना अनुदानित शाळा मध्ये विद्यार्थ्याना प्रवेश नाकारला जात असल्याने पालक पाल्य चींताचुर झाले आहेत. तर इंग्रजी शाळा भरम साठ फिस आकरत असल्याने पालकाच्या खिशाला मोठी अर्थिक झळ सहन करण्याची वेळ आली आहे. कोणती ही शाळा फीस अभावी विद्यार्थ्याना प्रवेश नाकारत असेल असा शाळेची मान्यता रद करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाअध्यक्ष भारत तांगडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
तालुक्यात अनेक अनुदानित व विनाअनुदानित शाळा ह्या प्रवेशासाठी पालकां कडून पैशाची मागणी करत आहेत. पैशाची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशा पासून वंचित ठेवण्याचे काम काही शाळा करत आहेत. तर तालुक्यातील अनेक असा इंग्रजी शाळा आहेत जे की, भरम साठ फिस् आकारणी करत आहेत. असा अवाजवी फिस आकारणी करणाऱ्या शाळा वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येतं आहे. जर कोणती ही अनुदानित व विना अनुदानित शालेकडून प्रवेशा साठी पैशाची मागणी होत असेल तर अशा पालकांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष भारत तांगडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks