एम. एस. ई. बी. उप अभियंता विवेक मोहोळ व सहाय्यक अभियंता रोहित थावरे यांना कायमस्वरूपी निलंबित करा

-माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )

एम. एस. ई. बी. विरोधात ग्रामस्थांची विविध समस्यांची तक्रार

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
तालुक्यातील पात्रुड येथील एम. एस. ई. बी. कार्यालयाच्या संदर्भात विविध समस्यांच्या लेखी तक्रारी अनेक वेळा ग्रामस्थांनी केल्या. उपोषणे, रस्ता रोको आंदोलने केली तसेच विद्यमान आमदारांनी देखील वेळोवेळी दूरध्वनी वरून लेखी पत्राद्वारे कळवले आहे. मात्र येथील निगर गठ्ठ मनाचे अधिकारी खुर्चीवर बसलेले असल्यामुळे आज पर्यंत कोणत्याही समस्याचे निराकारण त्यांनी केले नाही. तसेच तेलगाव येथील उपअभियंता विवेक मोहळ व पात्रुड येथील सहाय्यक अभियंता रोहित रमेश थावरे या दोघांनी कामात हलगर्जीपणा करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे

उपअभियंता विवेक मोहळ, सहाय्यक अभियंता रोहित रमेश थावरे यांच्यावर विभागीय चौकशी समिती नेमून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे. कारण तेलगाव विभागाअंतर्गत प्रत्येक गावाला लोकांनी शेतीपंपासाठी लागणारे रोहित्र जळाल्यानंतर स्वखर्चाने बसवलेले आहेत. त्याचबरोबर डी.पी.चे किटकॅट केबल तेल पूर्णतः बाहेरून विकत घेऊन गरज भागवली आहे. मात्र वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी अशी अनेक बोगस दिले.

उचलल्याचे संपूर्ण परिसरात बोलले जात आहे. यामुळे या दोघांवर विभागीय चौकशी नेमून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे असे निवेदन पात्रुड येथील ग्रामस्थांच्या वतीने कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना दिले व या निवेदनामध्ये पात्रुड येथील असणाऱ्या समस्या जसे की, गावठाण डी.पी. स मंजुरी देऊन तात्काळ कामास सुरुवात करण्यात यावी, गावात एकूण २२ स्ट्रक्चर आहेत त्याला एकूण १५- २५ चे एकूण ६६ डब्यांची आवश्यकता आहे मात्र आज रोजी ४९ असल्याने सतत डब्बे जळण्याचे प्रमाण वाढले आहे करिता किमान २५ चे २५ डबे देण्यात यावेत. संपूर्ण गावात जेवढे स्ट्रक्चर आहेत त्यांना नवीन केबल व किटकॅट देऊन बसविण्यात यावे.

गावातील संपूर्ण स्ट्रक्चरच्या अर्थिंग चे काम करण्यात यावे, गावातील पोल वरील तारा अतिशय जीर्ण झालेल्या असल्याने व त्या लोमकळलेल्या असल्याने तारा व जुन्या तारा बदलण्यात यावे, गावातील अनेक ठिकाणी पोल वाकलेले जीर्ण झालेले असल्यामुळे नवीन पोल बसविण्यात यावेत, नवीन कोटेशन धारक लोकांना मागणी केल्यानंतर किमान ६ ते १० महिने थांबावे लागते. मीटर मिळत नसल्याने ते तात्काळ देण्यात यावे, गावातील कोटेशन धारक लोकांना अंदाजे बिल ७० हजार ते १ लाख रुपये महिन्याला येत असल्याने त्याच्या दुरुस्तीबाबत कोणताही निर्णय होत

नसल्याने यांना तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी, गावातील वाढत्या लोकसंख्येनुसार नव्याने ३ स्ट्रक्चर ला मंजुरी देण्यात यावी. यासह इतर मागण्याचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले असून या मागण्याबाबत दि. २३/ ५/२०२३ रोजी एम. एस. ई. बी. कार्यालयासमोर पात्रुड शाखा येथे ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks