गायरान धारकांच्या एल्गार मोर्चास हजारोच्या संख्येने उपस्थित रहा – अविनाश जावळे

माजलगांव / प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री तथा सामाजीक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले व रिपाई चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा वरून माजलगाव तहासिल कार्यालयावर यल्गार मोर्चा धडकणार असून या मोर्चाचे नेतृत्व रिपाईचे माजलगाव तालुका आध्यक्ष अविनाश जावळे हे करणार आहेत .
भुमीहिन गायरान धारक कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी मुळ कागदपत्रे व पुराव्यासह प्रस्तावदाखल करत पाठपुरावा करत आहेत परंतु अलीकडच्या काळात पंजाब न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार त्याचा आधार घेऊन राज्य सरकार भूमिहीन गायरानधारकांना जमिनीपासून व घरापासून बेघर करण्यासाठी नोटिसा देऊन अन्याय करत आहे . गायरान धारकांना देण्यात आलेल्या नोटीसांना तात्काळ स्थगिती देऊन निर्णय मागे घेण्यासाठी माजलगांव रिपाई च्या वतीने तहसील कार्यालयावर दिनांक १५ जून २०२३ गुरुवार रोजी सकाळी ११ : ०० वा . यल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश जावळे यांनी केले आहे .
या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशिची शिक्षा देण्यात यावी व त्यांच्या भावास शासकिय सेवेत समाविष्ट करण्यात यावे व तसेच कुटूंबीयांस ५० लाखाचा निधी महाराष्ट्र शासनाने तात्काळ द्यावा .
लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गिरीधारी तपघाले, मुंबई येथील कु. हिना मेश्राम यांच्या मारेक-यांचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून शासना मार्फत वकिलांची नियुक्ती करण्यात यावी व या सर्व प्रकणांची चौकशी सि.बी.आय. मार्फत करण्यात यावी. या व अशा विविध मागण्याच्या संदर्भाने मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चास हजारोंच्या संख्येने रिपाई कार्यकर्त्या सह गायराणधारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अविनाश जावळे यांनी केले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks