तहसीलदार साहेब तुमच्या तालुक्यात चाललंय तरी काय? आनंदाचा शिधा सर्व गावो-गावी वाटप;का झाला न्हाय ??

अंगठे घेऊन केले समाधान, धान्यासाठी, जनता मात्र चकरा मारूनी हैरान

तालुका प्रतिनिधि: सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो यावर्षी दिवाळी सण हा एन सोयाबीन काढणीच्या सीजनमध्ये आल्यामुळे अनेक मजुरांनी शेतातच दिवाळी सण साजरा केला.तसेच या दिवाळी सणामध्ये परतीच्या पावसाने सुद्धा धुमाकूळ घातला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके हे पाण्याखाली गेले.

यावर्षी कोरोना संकटातून सावरल्यानंतर यावर्षी दिवाळी गोड होईल असा अनेकांचा समज होता परंतु निसर्गाने आणि शासनाने शेतकऱ्यांची पुरती वाट लावली अनेक शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त पिकाचे पैसे अजूनही मिळाले नाही. तसेच दिवाळी सणानिमित्य गोरगरिबांना तेल, रवा, साखर, आणि हरभरा डाळ, देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली परंतु लक्ष्मीपूजन सण झाला, भाऊबीजेचा सण झाला, पाडवा झाला, अजूनही लातूर जिल्ह्यामध्ये देवणी तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातील लोकांना मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आनंदाचा शिधा भेटलेला नाही.

शंभर रुपयांमध्ये हरभरा डाळ, खाद्यतेल, एक किलो रवा, एक किलो साखर, असे साहित्य शंभर रुपयांमध्ये ग्रामीण भागामध्ये राशन दुकानदाराकडे मिळते परंतु साखर, रवा, आणि तेल याबरोबर हरभऱ्याची डाळ अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक दुकानदारांनी अजूनही आनंदाचा शिधा हे चार साहित्याची किट वाटलेली नाही. त्यामुळे आनंदावर विरजण पडल्यासारखे झाले आहे अनेक गोरगरिबांना दिवाळीच्या अगोदर आनंदाचा शिधा मिळायला हवा होता परंतु आता दिवाळी संपल्यानंतर अजूनही आनंदाचा शीधा उपलब्ध नसल्यामुळे देवणी तालुक्यातील वलांडी येथे बायोमेट्रिक करून घेऊन गेले ते आनंदाचा शिधा दिलेलाच नाही. रेशनधारकांनी विचारणा केलि असता तुम्हाला जिथे तक्रार करायची आहे तिथे करा अशे उद्धट उत्तर दिले जात आहे. म्हणजेच या सर्व प्रकारास तहसीलदार साहेब यांची मुकसमती आहे असे समजायचे काय असा प्रश्न जनतेला पडला आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks