पुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ काबंळे यांचे हृदय विकाराच्या झटक्यान दुःखद  निधन

पुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ काबंळे यांचे हृदय विकाराच्या झटक्यान दुःखद  निधन
माजलगाव / प्रतिनिधी
पुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ काबंळे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हाचा अभ्यासू नेतृत्व शांत, स्वभाव व सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हाचे २०२१ साली ते पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी अध्यक्ष पद भुषविले होते. रामनाथ काबंळे यांनी फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले होते.

त्यांच्या रूपाने पुरोगामी पत्रकार संघाला अनमोल हिरा मिळाला होते. त्यांच्या जाण्याने पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्ह्याचा आवाज शांत झाला असून त्यांच्या अकस्मित जाण्याने पुरोगामी पत्रकार संघा मध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. पुरोगामी पत्रकार संघाच्या प्रत्येक पत्रकारास त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असे. रामनाथ काबंळे हे साईराम गॅस एजन्सीचे मालक होते. एक राजकीय व्यक्तीमत्व म्हणून ही त्यांची ओळख होती. रामनाथ काबंळे यांच्या दु:खद निधनामुळे सर्व स्तरातुन हळहळ व्यक्त होत आहे.

रामनाथ कांबळे
यांना पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल पुरोगामी पत्रकार संघ प्रा. दशरथ रोडे  भागवत वैद्य,  धिवार राजकुमार, पृथ्वीराज निर्मळ, समाधान गायकवाड, राम कटारे, नईम आतार, अमर साळवे, रजित घाडगे, अनिल वैरागे, नवनाथ पौळ, आजय गोरे,  प्रसन्नजीत  आचार्य, अहमद पठाण, मनिषा ताई घुले.

सह वर्तमान महाराष्ट्र न्यूज

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks