पुरोगामी पत्रकार संघाला लक्ख करणारा एक कोहिनूर हिरा म्हणजेच प्रा. रोडे सर!

पुरोगामी पत्रकार संघा’ चे आदरणीय – प्रा. रोडे “एक कोहिनूर हिरा”

९ जून रोजी प्रा. दशरथ तथा माता -पिता गंगाबाई वैजनाथ रोडे यांच्या पोटी अतिशय मागास व ग्रामीण भागात मौजे इंदपवाडी या गावी जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी गावी झाले तर माध्यमिक ,उच्च माध्यमिक ते पदवी वैद्यनाथ कॉलेज , परळी वैजनाथ येथे झाले. वडील कॉ. वैजनाथ रोडे हे डाव्या विचारसरणीचे असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची एक कॉम्रेंट लाल सलाम ची आजही ओळख आहे. बीड जिल्ह्याचे माजी खासदार. कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांचे अत्यंत विश्वासू मित्र असल्याने शिक्षण सम्राट, कर्मवीर भाऊराव पाटील, नानासाहेब पाटील, आ. एन.डी.पाटील. कॉ. अशोक ढवळे, कॉ.. डी.एल. कराड. अन्य डाव्या विचारसरणीसोबत संपूर्ण आयुष्य झोकून दिले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून एक
कॉ.वैजनाथ रोडे यांची ओळख बीड जिल्ह्यात आहे.

कॉ. रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुला प्रा. रोडे यांंना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय चळवळीत असलेल्यामुळे सर्व प्रशिक्षण घरीच मिळाले. शैक्षणिक, सामाजिक ,चळवळीच्या आखाड्यात जन्म घेतल्यामुळे डावपेच येणारच यात शंका नाही.एम ए इंग्रजी ( पदवीधर ) झाल्यानंतर प्राध्यापक जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख कार्यरत आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे सत्यच आहे. प्रा. दशरथ रोडे हे कोणत्याही राजकीय किंवा राजकारण व्यक्तींच्या बळी पडलेले नाहीत. राज्यात पुरोगामी विचारांची स्वतंत्र चळवळ मा. विकास सुर्यवंशी सरांसोबत विश्वासाने उभा केली. पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पासून ते महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष पर्यंत पत्रकारितेचा पाया खंबीरपणे उभा केला. बीड जिल्ह्यातील नाव पुरोगामी एक एक पत्रकार संघाला जोडता जोडता राज्याच्या मंत्रालय पर्यंत झेप घेतली. केज तालुक्यातील बनसोराळा खेड्यांचे केज तालुकाध्यक्ष पदी राजकूमार धिवार या युवकाला एक होतकरू पत्रकार संधी दिली. केज तालुकाची पुरोगामी पत्रकार संघाची शाखा स्थापना करुन विश्वास संपादन केला. ‌ काही वर्षांनंतर एक अनुभवी पत्रकार धिवार यांना बीड जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आले याच वर्षी २०२२ जानेवारी ३१ रोजी पुरोगामी पत्रकार संघ, केज ,शाखेच्यावतीने ‘ मूकनायक, वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. विजय सुर्यवंशी, विनोद पवार, प्रविण परमार,राज्य अध्यक्ष विजयकुमार वाव्हळ, राज्य संघटक भागवत वैद्य यांनी मोलाचे सहकार्य केले आज राज्य कार्याध्यक्ष पदी प्रा. रोडे काम करत असतांना ना वाद, ना. धोका संघाला पत्रकार जोडण्याचे संघटन, निष्ठा, ध्येय, यांचे कौशल्य अंगी आहे. त्यामुळेच राज्यात एक संघ ! , एक निष्ठा !! एक ध्येय !!!

तसेच जन सन्मान या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय या विषयावर संपादकिय लिखाणातून आपले जन सामान्य लोकांच्या बाजूने लेखन, व लेखणीतून जनजागृती नेहमीच सहकार्य करत आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व प्रा. दशरथ रोडे सर यांचे आहे. आज ९ जून रोजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छूक :-
आयु. निर्मळ पृथ्वीराज (उप. संपादक) वर्तमान महाराष्ट्र
तालुकाध्यक्ष पत्रकार माजलगांव तथा बीड जिल्हा- कार्यध्यक्ष- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ. बीड

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks