माजलगाव येथील हमाल गंगाधर भिवराजी गाते यांचा मुलगा डॉ. सर्जेराव गाते झाला एम.बी.बी.एस. परीक्षा पास

माजलगाव /( पृथ्वीराज निर्मळ )
माजलगाव येथे कबाड कष्टाची हमालीची कामे करणारे गंगाधर भिवराजी गाते यांचा मुलगा डॉ. सर्जेराव गाते हा गोदावरी फौंडेशन संचालित डॉ . उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव येथून एम. बी. बी. एस . ची परीक्षा पास होवून त्याला डिग्री प्रदान करण्यात आली आहे त्याचे या यशाबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
माजलगाव शहरातील नवनाथ नगर येथे वास्तव्यास असलेले कबाड कष्टाची हमाली कामे करणारे गंगाधर भिवराजी गाते यांना तीन मुले आहेत त्यांनी हमाली करून तीन मुलांना शिक्षण दिले मोठा मुलगा गोरखनाथ गाते हा एस.टी.आय. झाला आहे. तर दुसरा राजेश गाते हा मुंबई ला पोस्टमन असुन. त्यांचा तिसरा मुलगा डॉ. सर्जेराव गाते हा २०२० – २०२१ ला एम.बी.बी.एस. परीक्षा पास होवून त्याने एक वर्षे ट्रेनिंग केले आहे. आणि त्याला मोठ्या कार्यक्रमात डिग्री प्रदान करण्यात आली आहे. या यशाबद्दल गाते परिवाराचे माजी जि.प.सदस्य बबनराव सरवदे, रामराव काकडे, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम येवले, तालुका अध्यक्ष उमेश मोगरेकर , पत्रकार कमलेश जाब्रस, पुरूषोत्तम करवा, महेंद्र मस्के, गोंविदराव पितळे, विष्णु मुंदडा, सतुसेठ जालनेकर, सुनील लड्डा, त्रिंबकराव शिंदे, विठ्ठल सातपुते, चंद्रकांत गाते, अशोक गाते, बाळु गाते, रामभाऊ मुसळे, शेषराव आबुज, आदींनी अभिनंदन केले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks